scorecardresearch

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक कशासाठी केलं?; भाजपानं पाच मुद्द्यांवरून लगावला टोला

उद्धव ठाकरेंच्या कौतुकाबद्दल भाजपाने शरद पवार यांना प्रश्न केला आहे. त्याचबरोबर पाच उदाहरण सांगत पवारांना टोलाही लगावला आहे.

sharad-pawar, uddhav-thackeray, bdd chawl mumbai
उद्धव ठाकरेंच्या कौतुकाबद्दल भाजपाने शरद पवार यांना प्रश्न केला आहे. त्याचबरोबर पाच उदाहरण सांगत पवारांना टोलाही लगावला आहे. (छायाचित्र। जितेंद्र आव्हाड > ट्विटर)

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. अलीकडे महाराष्ट्रावर सतत नवनवी संकटे येत आहेत. अतिवृष्टीचे संकट मोठे आहे; पण या सर्व संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे, असं शरद पवार म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या कौतुकाबद्दल भाजपाने शरद पवार यांना प्रश्न केला आहे. त्याचबरोबर पाच उदाहरण सांगत पवारांना टोलाही लगावला आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केले पण कशासाठी कौतुक?, असा सवाल केला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीतील पाच उदाहरणंही दिली आहेत. “शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक? कारण गेले दिड वर्ष भाषणातले शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन व त्यांचं ड्रायव्हिंग या हेच तर जनता पहातेय. ते जे प्रकल्प सुरू करत आहेत ते सुरू केले देवेंद्र फडणवीस यांनी”, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

संबंधित वृत्त- …ही हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली; शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

“उलट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर…
कोरोनातील अपयश
मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश
ओबीसी आरक्षण अपयश
पूरग्रस्तांना मदतीत अपयश
शेतकऱ्याना मदतीत अपयश..
ही अपयशाची यादी वाढू शकते”, असं सांगत उपाध्ये यांनी पवारांना टोला लगावला आहे.

पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

अलीकडे महाराष्ट्रावर सतत नवनवी संकटे येत आहेत. अतिवृष्टीचे संकट मोठे आहे; पण या सर्व संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. एकीकडे पूरग्रस्तांची घरे बांधण्याचे आव्हान तर दुसऱ्या बाजूस शंभर वर्षे मुंबईत कष्ट करून देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 10:48 IST

संबंधित बातम्या