महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या न्यायालयाने समन्य बजावलं आहे. २००८ साली राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड रोडवर एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. त्याच प्रकरणात राज ठाकरेंना १२ जानेवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार आहेत.

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान

हेही वाचा : “दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचं केसरकरांना प्रत्युत्तर; म्हणाले, “शिंदे गटात…”

परळी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध ६ जानेवारी २०२२ ला अजामीनपात्र वॉरंट काढत, १० फ्रेब्रुवारी २०२२ पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : “किरीटभाऊ बंगल्यांची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडेही…”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

या प्रकरणातील मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहत, अजामीनपात्र वॉरंट रद्द केलं होतं. पण, १३ एप्रिल २०२२ ला दुसऱ्यांना अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं. आता पुन्हा एकदा १२ जानेवारीला हजर राहण्यासाठी राज ठाकरेंना परळी न्यायालयाने समन्य बजावलं आहे. त्यानुसार राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.