बीड: राजुरी -पाटोदा मार्गावरील उकंडा तळ्यावळ गुरुवारी (दि. १०) रात्री ११.३० झालेल्या एका भीषण अपघातात तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. कैलास टुले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके असे मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे नवगण राजुरी गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.

तिघे मित्र दुचाकीवरून राजुरी गावाकडे येत होते. दरम्यान, उकंडा तलावाजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीला एका भरधाव मोलमोटारीने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी वाहनचाলकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे किंवा इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा गंभीर आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. राजुरी -पाटोदा मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करणे बंधनकारक असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे