बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. याप्रकरणी आबा उर्फ मुंजबा गिरी या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. तसेच, या स्फोटामागे अतिरेकी हात नसल्याचं स्पष्टीकरणही मुंबई पोलिसांनी दिलं आहे.  अंबाजोगाई-मुंबई गाडीत एक पार्सल बेवारस राहिल्यानंतर वाहक ओम निंबाळकर यांनी ते आपल्या घरी नेले व त्यातील रेडिओमध्ये सेल टाकून तो सुरू करताच स्फोट झाला. यात ओम निंबाळकर, त्यांची पत्नी उषा, आई कुसुम व मुलगा कुणाल (वय २) गंभीर जखमी झाले.  प्राथमिक उपचारानंतर शनिवारी पुढील उपचारासाठी जखमींना मुंबईस हलविण्यात आले.
शुक्रवारी दाखल झालेले एटीएसचे पथक आणि दिल्लीहून आलेली एनआयएची तुकडी घटनास्थळी तपास करत आहे. स्फोटामागे दहशतवादी हात आहे का याचीही चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिस आणि एटीएसनंही या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या स्फोटामागील कारणांचा फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खुलासा होणार आहे.