मराठा आरक्षण : बीडमध्ये तरुणाने संपवलं जीवन

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

(बीडमधील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख या तरुणाने मंगळवारी (31 जुलै) सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील विडा येथील तो रहिवासी होता. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असा उल्लेख आहे.

विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी घेतलेला अभिजित देशमुख हा नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांवर बँकेचं कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची खंत त्यानं मित्रांकडे व्यक्त केली होती. तसंच, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनातही त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.

दरम्यान, संबंधित चिठ्ठी त्यानेच लिहिली आहे का? याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beed youth abhijit deshmukh suicide for maratha reservation