साताऱ्यात बीड येथील युवकाचा खून

मृताची ओळख पटली असून त्याचे मारेकरी देखील समोर आले आहेत.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

वाई : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळ खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ३५ वर्षीय युवकाचा हा मृतदेह असून अमोल डोंगरे (मूळ रा. बीड ) असे त्याचे नाव आहे. अमोलचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अमोल डोंगरे बेपत्ता असल्याबाबत सिंहगड, पुणे पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे.

सातारा शहरालगत खिंडवाडीतील दगडाच्या खाणीमध्ये चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाणीतील पाण्यातून मृतदेह वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यात अपयश होते.

अखेर मंगळवारी रात्री माहिती समोर येत गेली आणि पोलिसांनी वेगाने तपास केला. मृताची ओळख पटली असून त्याचे मारेकरी देखील समोर आले आहेत. दरम्यान, लवकरच पोलीस याबाबतची माहिती देणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beed youth murdered in satara srk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या