भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवरून एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी बीड मधील माफिया कारभारावरून निशाणा साधला आहे.

“बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Raj Thackeray Uddhav Thackeray
आगामी काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत म्हणाले, “दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, फक्त…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

शिवाय, या मुद्य्याची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केलं आहे.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे मागील काही दिवसांमधील घटनांवरून दिसून येत आहे. अनेक राजकीय मंडळी देखील विविध गुन्ह्यांमध्ये आढळून येत आहे.