"माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे...", पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य | Bhagat Singh Koshyari say himself beggar mentioning PM Narendra Modi | Loksatta

“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य
भगतसिंग कोश्यारी व नरेंद्र मोदी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. “सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या, तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही,” असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. ते गुरुवारी (२९ सप्टेंबर) नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आर्थिक दृष्टीने आपण पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची होणार आहे. मला तर वाटतं तुम्ही सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही. हे सगळं तुम्ही सर्व लोकच करू शकता.”

व्हिडीओ पाहा :

“भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे,” असं मत भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

“गडकरी म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या”

कोश्यारी पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाला नितीन गडकरीही येत आहेत. ते मला म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या, मी आठ लाख कोटी रुपयांची कामं करेन. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी.”

हेही वाचा : “तेव्हा अजित पवारांच्या मागे…”, “ती राज्यपालांची मोठी चूक…”; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले

“आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो,” असंही कोश्यारींनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…तर त्या बदल्यात दसरा मेळाव्याला सहकार्य करू”, काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिल्याचा मनसेचा मोठा दावा

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”!
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….
अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…