केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांची अनेक भाषणंही गाजली आहेत. विशेष म्हणजे ते आपल्या भाषणांमध्ये कायम अनेक किस्से सांगत श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवतात. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरींचाच एक किस्सा सांगितला आहे. यात कोश्यारी यांनी नितीन गडकरींनी माझ्याकडे आठ हजार रुपये मागितले होते, असं सांगितलं. भगतसिंग कोश्यारी गुरुवारी (२९ सप्टेंबर) नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते.

कोश्यारी पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाला नितीन गडकरीही येत आहेत. ते मला म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या, मी आठ लाख कोटी रुपयांची कामं करेन. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी.”

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Amit Satam vs Varsha Gaikwad
“राहुल गांधी कुठे मस्ती करतो ते…”, अदाणींचा उल्लेख करताच भाजपा आमदार विधानसभेत आक्रमक; वर्षा गायकवाडांबरोबर खडाजंगी
What Uddhav Thackeray Said?
“आम्ही मनोज जरांगेंच्या मागे असू तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? देवेंद्र फडणवीस यांनी..”, उद्धव ठाकरेंचं उत्तर

“इच्छा असेल तर सर्व गोष्टी होतात”

“आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो,” असं भगतसिंग कोश्यारींनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही”

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आर्थिक दृष्टीने आपण पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची होणार आहे. मला तर वाटतं तुम्ही सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही. हे सगळं तुम्ही सर्व लोकच करू शकता.”

हेही वाचा : “तेव्हा अजित पवारांच्या मागे…”, “ती राज्यपालांची मोठी चूक…”; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले

“भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे,” असंही भगतसिंग कोश्यारींनी म्हटलं.