Premium

“गडकरी मला म्हणाले होते की, तुम्ही आठ हजार रुपये द्या, मी…”, राज्यपाल कोश्यारींनी सांगितला ‘तो’ किस्सा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरींचाच एक किस्सा सांगितला आहे. यात कोश्यारी यांनी नितीन गडकरींनी माझ्याकडे आठ हजार रुपये मागितले होते, असं सांगितलं.

Bhagat Singh Koshyari Nitin Gadkari
भगतसिंग कोश्यारी व नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांची अनेक भाषणंही गाजली आहेत. विशेष म्हणजे ते आपल्या भाषणांमध्ये कायम अनेक किस्से सांगत श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवतात. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरींचाच एक किस्सा सांगितला आहे. यात कोश्यारी यांनी नितीन गडकरींनी माझ्याकडे आठ हजार रुपये मागितले होते, असं सांगितलं. भगतसिंग कोश्यारी गुरुवारी (२९ सप्टेंबर) नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोश्यारी पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाला नितीन गडकरीही येत आहेत. ते मला म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या, मी आठ लाख कोटी रुपयांची कामं करेन. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी.”

“इच्छा असेल तर सर्व गोष्टी होतात”

“आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो,” असं भगतसिंग कोश्यारींनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही”

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आर्थिक दृष्टीने आपण पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची होणार आहे. मला तर वाटतं तुम्ही सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही. हे सगळं तुम्ही सर्व लोकच करू शकता.”

हेही वाचा : “तेव्हा अजित पवारांच्या मागे…”, “ती राज्यपालांची मोठी चूक…”; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले

“भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे,” असंही भगतसिंग कोश्यारींनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhagat singh koshyari tell incident of nitin gadkari asking for 8 thousand rupees rno news pbs

First published on: 29-09-2022 at 17:09 IST
Next Story
“२०२४ जवळ येईल तेव्हा धक्के बसतील, खूप बॉम्बस्फोट होतील,” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान