scorecardresearch

भगवंत खुबा यांची आरसीएफ थळ प्रकल्पाला भेट

केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी ( दि ८)  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली. 

अलिबाग : केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी ( दि ८)  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली. आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्र्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा केली. त्यानंतर विविध संयंत्रांना भेट देऊन संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.तत्पूर्वी आरसीएफ थळच्या प्रशासकीय इमारतीसमोर वृक्षारोपण  तसेच कार्यकारी संचालक थळ यांच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मंत्रीमहोदयांनी केले. भेटीदरम्यान सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन आरसीएफने 2021-2022 मधे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले, कोरोना महामारीच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी  अभिनंदन केले.  या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhagwant khuba visits rcf site project central chemicals fertilizers unconventional project ysh

ताज्या बातम्या