मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कंत्राटी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. त्याला शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी लोकही पुढे जाऊन कायमस्वरूपी होतात, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरे परवा मुंबईत बोलले आणि मनसे कार्यकर्त्यांनी आज ‘करुन दाखवले’; पुण्यात ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा

गोगावलेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर?

आम्ही आज जी घोषणाबाजी केली, ती त्यांच्या चांगलीच वर्मी लागली. आम्हाला कोणी काही विचारते का, याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का, अशी टीका त्यांनी शिवसेनेच्या आमदारांवर केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या कंत्राटी टीकेसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, की कंत्राटी लोकं सुद्धा पुढं जाऊन कायमस्वरूपी होतात.

हेही वाचा – Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ म्हणताच मुनगंटीवार संतापले, म्हणाले “आपल्याच पित्याला…”

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

बुधवारी मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. ”कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हेही कंत्राटी आहेत. ते मुख्यमंत्री म्हणून किती काळ राहतील, हे त्यांनाच माहीत नाही. राज्यात सध्या दोन चाकी ‘ईडी’ सरकार चालले आहे”, अशी टीका त्यांनी केली होती.