नांदेड : भाजप व काँग्रेस यांनी सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही देशातील शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा झाली नसल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीने केला आहे.  २४ तास मोफत वीज-पाणी, लागवडीसाठी एकरी दहा हजार रुपये व अपघाती मृत्यू झाला, तर पाच लाख रुपये देण्याचे पंचसूत्री तेलंगणा प्रारूप समोर ठेवत पक्षाचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी येथे महाराष्ट्रात त्यांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

लोहा येथील बैलबाजार मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना ‘अब की बार, किसान सरकार’ हा नारा देऊन राव यांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही जात, धर्मापलीकडे विचार करून एकी साधावी, असे आवाहन केले. सभेची सुरुवातच राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत केली. फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले वार्षिक सहा हजार रुपये अनुदान एक प्रकारची भीक असल्यासारखी असून, त्यामागेही बीआरएसला नांदेडमधील प्रतिसाद मिळालेल्या सभेचा धसका असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणातील पंचसूत्रीचे प्रारूप लागू केले आणि दलितबंधूंना १० लाख रुपये देण्याची योजना लागू केली, तर आपण येथे येणे बंद करू, असे आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले.

Vijay Vadettiwar
“शिंदे गटाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, त्यांचे निम्मे आमदार…”; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
Congress Sangli
सांगलीत काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जागा सुटण्याबाबत साशंकताच
maharashtra lokrang article, maharashtra lokrang
प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

देशात मुबलक कोळसा, पाणी

देशात पुढील सव्वाशे वर्षे पुरेल एवढा कोळसा उपलब्ध आहे. तब्बल ३६१ मिलियन टन कोळसा असून त्याद्वारे वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना २४ तास पुरवठा करता येऊ शकतो. परंतु ते आपल्याकडे होत नाही. देशातील ४१ कोटी एकर जमीन कृषिभूमी असून, येथे स्वच्छ सूर्यप्रकाश, मुबलक पाऊस आणि आंबा ते सफरचंदांपर्यंत फळे, पिके येथे पिकतात. परंतु देशातील ५० हजार टीएमसी पाणी समुद्राला जाऊन मिळते, त्याचे नियोजन होत नाही. त्याच पाण्याचे नियोजन करून शेतीला पुरवले, तर शेती सुजलाम् सुफलाम् होईल. दुर्दैवाने पाण्याऐवजी आपल्याला भाषण दिले जाते, असे टीकास्त्र राव यांनी राज्यकर्त्यांवर सोडले.