scorecardresearch

“शिंदे गटात जाण्यासाठी भास्कर जाधवांनी १०० वेळा फोन केला”, भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट!

भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी जवळपास १०० फोन केले होते, असा गौप्यस्फोट भाजपा नेत्याने केला आहे.

eknath shinde and bhaskar jadhav
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एकमेकांवर केली जाणारी चिखलफेक थांबायचं नाव घेत नाहीये. अशी एकंदरीत स्थिती असताना भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी जवळपास १०० फोन केले होते, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांचा भास्कर जाधवांवर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी भास्कर जाधवांना आपल्या गटात सामावून घेतलं नाही, असा खुलासा मोहित कंबोज यांनी केला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत हा आरोप केला आहे.

हेही वाचा- “मोगॅम्बोच्या अनेक पिढ्या आल्या तरी…”, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र!

संबंधित व्हिडीओत मोहित कंबोज म्हणाले, “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान १०० वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं. पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते.

हेही वाचा- “…हा हलकटपणा आहे”, शिंदे गटाच्या ‘त्या’ कृत्यावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

“कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते. जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते,” असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 23:55 IST
ताज्या बातम्या