भास्कर जाधवांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री; त्यांच्याच शैलीत खिल्ली उडवत म्हणाले, …

काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा, असे नागरिक मोदींना सांगत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

Bhaskar Jadhav Narendra Modi

राजकारणात अनेकदा नेते एकमेकांची नक्कल करताना आपण पाहिलं आहे. विशेषतः राज ठाकरे इतर नेत्यांनी मिमिक्री करताना दिसून येतात. पण आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हेही मिमिक्री करताना दिसले. मिमिक्री केली तेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यांच्या भाषणाच्या शैलीची नक्कल करत त्यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.

नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत येण्यापूर्वी गेल्या ६० वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले, असा सवाल विचारत होते. सामान्य नागरिकही, काँग्रेसने काहीच केले नाही, असे सांगत त्यांना प्रतिसाद देत होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन कार्यकाळांमध्ये काहीच केले नाही, हे लोकांच्या आता लक्षात येत असल्याची टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली. ते सोमवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही, असे मोदी आणि सामान्य नागरिकांकडून म्हटले जात होते. मात्र, लोकांची ही भावना आता बदलली आहे. काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा, असे नागरिक मोदींना सांगत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

देशात प्रचंड महागाई झाली आहे. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती किती वाढल्या आहेत? मध्यंतरी मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. तेव्हा नागरिक नरेंद्र मोदी फुकट गॅस देत आहेत, म्हणून त्यांच्यामागे धावत सुटले. तेव्हा मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील. एखादा दुकानदार तुम्हाला नंतर पैसे देण्याच्या अटीवर सामान देतो तेव्हा त्याचा अर्थ दुकानदाराने तुम्हाला सामान फुकट नव्हे तर उधारीवर दिले असा होतो. तो तुमच्याकडून सव्याज पैसे घेणार आहे. मोदी सरकारने सामान्यांना घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान काढून घेतले. या अनुदानामुळे एक वर्ष तुम्हाला गॅस मोफत मिळणार होता. तो अगोदरही मिळत होता. मात्र, मोदी सरकारने हा मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करुन लोकांची फसवणूक केल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhaskar jadhav mimics pm narendra modi vsk

ताज्या बातम्या