नारायण राणे आणि त्यांची मुलं, उदय सामंत आणि रामदास कदम हे सर्वजण माझ्याविरोधात विधानसभा निवडणुकीला तुटून पडणार आहेत. कारण, या सर्वांना अंगावर घेतलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या रोषालाही सामोरं जावं लागणार असल्याचं पूर्ण मला भान आहे. पण, एक तत्व आणि सिद्धांतासाठी उभा आहे. उद्धव ठाकरे एकाकी लढत असून, त्यांची साथ सोडायची नाही, या ध्येयानं उभा आहे, असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव बोलत होते. “उद्या निवडणुकीत हरेल किंवा जिंकेल याचा निर्णय मतदारांकडे सोपवला आहे. यांना मला हरवणं सोप्प नाही, हे मला माहिती आहे. पण, ही सर्व ताकदीची माणसं आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, सत्तेत आहेत. मी विरोधी पक्षातील आमदार आहे. लोकांना वाटतं मी हजारो कोटींचा मालक आहे. मात्र, माझं मलाच माहिती मी काय आहे,” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा

हेही वाचा : “२०२४ ला सत्ता आल्यावर शिवसेनेचा निकाल देणाऱ्याला चुना मळायला…”, संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका

“कमळ समजून घड्याळाचं बटण दाबा, असं…”

“२०१९ साली सर्वात ज्येष्ठ असूनही उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळे हातचा राखून राहिला पाहिजे होतं. परंतु, आज डोक्यात स्वार्थ आणि व्यवहार नाही आहे. जे घडलं आहे ते चुकीचं आणि वाईट घडलं आहे. २०१९ साली भाजपाने शिवसेनेच्या ७० जागा पाडल्या. माझ्या मतदारसंघात भाजपाची लोकं राष्ट्रवादीच्या बुथवर बॅनर लावून बसले होते. कमळ समजून घड्याळाचं बटण दाबा, असं सांगत होतं. हे निष्ठेच्या गोष्टी कोणाला सांगत आहेत. हे लोकं विश्वासघातकी आहेत,” अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपावर केली आहे.

हेही वाचा : “निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण…”, ठाकरे गटाचं शिंदे गटावर टीकास्र; बच्चू कडूंचाही केला उल्लेख!

“त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली, तरी…”

“त्यामुळे या सर्वांच्या विरोधात लढण्याचं ठरवलं आहे. फायदा किंवा नुकसानीचा विचार केला नाही. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आहे. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली, तरी कोणाला दोष देणार नाही,” असेही भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.