शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सईद खान यांची मालमत्ता जप्त केली आहे. 

३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन ८ कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची ३.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, एनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार विभाग, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.