मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांचाही उल्लेख केला होता. त्याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे टीका केली, त्यामुळे दुख: झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल; नरेंद्र मोदींचेही घेतले नाव; म्हणाल्या…

नेमकं काय म्हणाल्या भावना गवळी?

“माझ्या मतदार संघातल्या १ लाख बांधवाना मी २५ वर्षांपासून राखी बांधते आहे. हा उपक्रम नवीन नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुख्यमंत्री असल्यापासून राखी बांधते. त्यांना अहमदाबादला जाऊन मी भेटली आहे. त्यामुळे काल उद्धव ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मला दुख: झाले आहे. राखी सारख्या पवित्र बंधनाबाबत उद्धव ठाकरेंनी असं बोलणं योग्य नाही. मी कालपर्यंत उद्धव ठाकरेंची ताई होती. आज त्यांनी माझा ‘बाई’ म्हणून माझा उल्लेख केला. राजकारण करण्यासाठी आपल्याकडे अनेक विषय आहेत. मात्र, ज्या पद्धतीने माझ्या बद्दल बोलल्या गेले त्यामुळे मी प्रचंड दुखी झाली आहे”, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी! ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर PhonePe चा राज्य सोडण्याचा निर्णय; मुंबईतून कर्नाटकात हलवलं कार्यालय

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाबरोबर गेलेल्या आमदार खासदारांवर सडकून टीका केली होती. “ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाराचाराचे आरोप आहेत त्यांना तुम्ही क्लिन चीट देत आहात. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई तुम्हाला राखी बांधायला कशी मिळाली”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर केली होती.