अतिक्रमणधारकांचे बांधकाम न काढल्यास भीमशक्तीचा इशारा

आगग्रस्त अतिक्रमणधारकांनी सुरू केलेले पक्के बांधकाम काढण्यात यावे किंवा शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना बांधकाम करण्याची रितसर परवानगी देण्यात यावी, अन्यथा नगरपालिकेसमोर अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीमशक्ती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिला आहे.

आगग्रस्त अतिक्रमणधारकांनी सुरू केलेले पक्के बांधकाम काढण्यात यावे किंवा शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना बांधकाम करण्याची रितसर परवानगी देण्यात यावी, अन्यथा नगरपालिकेसमोर अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीमशक्ती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिला आहे.

गेल्या ११ फेब्रुवारीला वीज पडून जयस्तंभ चौकातील दुकानांना आग लागली होती. यात ९ दुकाने भस्मसात झाली होती. मागील आठवडय़ात नगर पालिका प्रशासनाने दुकानामागील बाजूला खचलेल्या भिंतीचे बांधकाम करण्याचे आदेश देऊन भिंतीचे बांधकाम केले, परंतु अतिक्रमणधारकांनी नगरपालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता भिंतीच्या बांधकामाला लागूनच स्वखर्चातून पक्क्या बांधकामाला सुरुवात केली आहे.
सिमेंटच्या विटांमध्ये स्लॅबपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यात एका नगरसेवक पतीचे दुकानही आहे. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आगग्रस्त अतिक्रमणधारकांनी केलेले पक्के बांधकाम त्वरित काढण्यात यावे किंवा शहरातील सर्व टपरीधारकांना बांधकाम करण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा नगरपालिका कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीमशक्तीचे युवा जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिला आहे.

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, दाम्पत्यासह ४ अटकेत
वार्ताहर, यवतमाळ
एक आठवडण्यापूर्वी वणी शिरपूर मार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका विवाहितेसह चौघांना अटक केली आहे.
प्रशांत चितांमण रणदिवे (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो उकणीचा राहणारा होता. याचे निळापूर येथील अनिल गोिवदा बोढाले यांच्याशी मत्रीचे संबंध होते. त्यातूनच प्रशांतचे अनिल बोढाले याची पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचे लक्षात आल्याने प्रशांतचा काटा काढण्याकरिता २२ फेब्रुवारीला अनिलने प्रशांतला जेवण करण्याच्या बहाण्याने निळापूर येथील घरी बोलवले आणि विनोद मारोती मिलमिले व वामन गोपाल पाचभाई यांच्या मदतीने प्रशांतचा डोक्यात हातोडा घालून खून केला.
गुन्हा लपविण्यासाठी प्रशांतचा मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन घुग्घुस मार्गावरील निलगिरी बनाजवळ अपघात झाल्याचे दर्शविण्याकरिता टाकून पोबारा केला.
उपविभागीय पोलीस अधिकार सविता तुरेकर, पोलीस निरीक्षक असलम खान, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पवार, कवडू चांदेकर, दिलीप सायरे, प्रज्ञा वाडेकर आदींनी केलेल्या तपासात अनिल बोढाले, त्याची पत्नी, विनोद मिलमिले व वामन पाचभाई या चौघांना अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली.

‘स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढणार’
प्रतिनिधी, बुलढाणा
राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल परवानाधारकांच्या कमिशनमध्ये वाढ होणार असून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारपोच वितरण योजनेंतर्गत दुकानात धान्य पोहोचवण्यात येणार असल्याचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
महासंघाने २ मार्चला आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी, काकासाहेब देशमुख, डी.एन.पाटील, राजेश अंबुसकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन ३ मार्चला राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी संघटनेच्या मागण्या व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर पुरवठामंत्री गिरीश बापट यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले, तर संघटनेचा बायोमॅट्रीक प्रणालीला विरोध नसल्याने संघटनेने कळवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhim shakti sanghatana portest against illigal works in buldhana

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!