कर्जत: खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यामध्ये भीमा नदीला पूर आला आहे. आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ते दौंड हा रस्ता भीमा नदीला पूर आल्यामुळे बंद करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर प्रशासनाने कर्जत तालुक्यातील सिद्धटेक व पुणे जिल्ह्यातील दौंड हद्दीमध्ये पोलीस बंदोबस्त देखील या पुलावर लावलेला आहे. तहसीलदार गुरु बिराजदार यांनी कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सावधगिरी चा इशारा दिला आहे. पुणे येथील खडकवासला धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे यामुळे कर्ज दोन रस्त्यावर असणारा कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील भीमा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाने बंद केले आहे. भीमा नदीपात्रामधून आज एक लाख ४० हजार ६२१ क्युसेक एवढ्या क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदी काठावर असणाऱ्या जलालपूर सिद्धटेक भांबोरा या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार गुरु बिराजदार यांनी भीमा नदीला पूर येतात सावधगिरी म्हणून पुलावरील वाहतूक तात्काळ बंद केली आहे. यामुळे वाहतूक खेड भिगवन या मार्गे वळविण्यात आले आहे. हेही वाचा : सांगलीचा पूरधोका टळला, विसर्ग कमी झाल्याने नद्यांतील पाणी ओसरले आर्वी बेट पाण्याने वेढले श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी गावाजवळ असणारे आर्वी बेट पाण्याने वेढले आहे. या गावाचा संपर्क इतर परिसराशी तुटला आहे. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तसेच घनश्याम शेलार यांनी होडी मधून या गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. हेही वाचा : Reservation : “आरक्षण संपवण्यासाठी भाजपा पडद्यामागे…”, रोहित पवारांचा गंभीर आरोप; राज ठाकरे-प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले… रोहित पवार यांनी शासनाला लक्ष देण्याचे आवाहन भीमा नदीला पूर येतात आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क करून भीमा नदी पात्राच्या लगत असणाऱ्या गावातील नागरिकांसाठी शासनाने तातडीने दक्षता घेऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यापूर्वीच त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे व त्यांची योग्य ती सोय करावी अशी मागणी केली आहे.