Bhimrao Dhonde : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होत आहे. सध्या राज्यभरात सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. असं असलं तरी या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचाही समावेश आहे. ते आष्टी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

माजी आमदार भीमराव धोंडे हे आष्टी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश धस आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगलंच राजकारण तापलं आहे. तीनही नेत्यांकडून प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. पण असं असतानाच भीमराव धोंडे यांनी एका सभेत बोलताना केलेल्या एका आवाहनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. झालं असं की, भीमराव धोंडे हे एका सभेत बोलत असताना चक्क आपलं शिट्टी हे चिन्हच विसरले आणि त्यांनी तुतारी वाजविण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या विधानामुळे भर सभेत मोठा हशा पिकला. पण चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Sadabhau Khot and Sharad Pawar
Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Sadabhau Khot : शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून सदभाऊ खोतांनी व्यक्त केली दिलगिरी; पण म्हणाले, “शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ…”

नेमकी काय घडलं?

आष्टी विधानसभा मतदारसंघातील एका सभेत भीमराव धोंडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आता निवडणुकीच्या प्रचारासाठी आणखी १५ दिवस राहिले आहेत. त्यामुळे गावागावात फेऱ्या काढायच्या आणि कसल्याही परिस्थितीत आपल्याला तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची, असं म्हणताच सभेत मोठा हशा पिकला. मात्र, आधी नेमकं काय झालं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. पण सभेत बसलेल्या काही लोकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर आपण चूकन बोललो, चूकन बोललो, असं म्हणत त्यांनी सारवासारव केली. त्यानंतर ते पुढे म्हणाले, “येथे तुतारी काय वाजत नाही. मी जरी बोललो असतो ना? तरी तुतारी तुम्ही वाजवणार नाहीत. मात्र, आपली शिट्टी वाजवा”, असं भीमराव धोंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भीमराव धोंडे यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं आहे. ते भाजपाचे माजी आमदार देखील आहेत. मात्र, यावेळी राज्याच्या राजकारणात बदलेल्या समीकरणाच्या युती आणि आघाडीच्या राजकारणाचा फटका अनेकांना बसला. कारण अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. आता आष्टी विधानसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाकडून सुरेश धस यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे माजी आमदार भीमराव धोंडे हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पण गेली अनेक वर्ष भाजपात राहिल्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केल्यामुळे भीमराव धोंडे यांना आपलं निवडणुकीचं चिन्ह (शिट्टी) नेमकं कोणतं? हे लक्षात राहिलं नाही आणि त्यांनी भर सभेत ‘तुतारी’ वाजविण्याचं आवाहन केलं. दरम्यान, भीमराव धोंडे यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत. भीमराव धोंडे यांनी हे विधान चुकून केलं की मुद्दाम केलं? असे प्रश्नही आता आष्टी विधानसभा मतदारसंघात अनेकांनी उपस्थित केले आहेत.

Story img Loader