महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २२ जानेवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान गट ब च्या मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससीने वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट – , मुख्य परीक्षा-२०२०- संयुक्त पेपर २२ जानेवारी २०२२ (शनिवार) होणार आहे. तर पोलीस उप निरीक्षक- पेपर दोन २९ जानेवारीला होईल. सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५ फेब्रूवारीला पेपर होणार आहे. तसेच राज्य कर निरीक्षक पेपर दोन १२ फेब्रूवारीला होणार आहे. एमपीएससीनं तीन महिने आधी या मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.