माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध चर्चांना उधाणं आले होते. मात्र, आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पवार यांच्याबरोबर काम केलं आहे. २०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
wardha, Sharad Pawar, amar kale,
शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
sharad pawar raj thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…
Nilesh Lanke
Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

दरम्यान, भाजपाने सूर्यकांता पाटील यांना गेल्या १० वर्षात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

सविस्तर वृत्त अपडेट होत आहे