माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध चर्चांना उधाणं आले होते. मात्र, आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पवार यांच्याबरोबर काम केलं आहे. २०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news public entry of bjps suryakanta patil joined sharad pawar group sgk
First published on: 25-06-2024 at 12:45 IST