बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. दुपारपर्यंतचे कल हाती आल्यानंतरच वेगवेगळ्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी नितीश कुमार यांच्या जदयूला मिळालेल्या कमी जागांवरून भाजपावर निशाणा साधणं सुरू केलं. आमदार रोहित पवार यांनीही भाजपा मित्रांना संपवत असल्याचा आरोप करत लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांचंही रोहित पवार यांनी कौतुक केलं आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त अर्थात जदयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचं दिसून आलं. मागील १५ वर्षांपासून बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या जदयूपेक्षा भाजपा जास्त जागा जिंकल्या. तर लोक जनशक्ती पार्टीमुळे जदयूला अनेक ठिकाणी फटका बसला. वरून रोहित पवार यांनी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर ट्विट करून भाजपावर टीका केली.

आणखी वाचा- नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधत दिलं उत्तर; म्हणाले…

“बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमारजी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की, काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी,” असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं होतं.

आणखी वाचा- “काँग्रेसनं महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला, आता…”

आणखी वाचा- Bihar Election: “संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल”

नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. “भाजपा/संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात, ते झाड वाळून जात आणि वेल मात्र वाढीस लागते. नितीशजी, लालूजींनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या. या अमरवेली रुपी भाजपा-संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका,” असा राजकीय सल्ला देत काँग्रेसनं राजदसोबत येण्याची ऑफर दिली आहे.