गोदावरीत दुचाकी कोसळून एक ठार

भरधाव मोटारसायकल गोदावरी नदीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले.

भरधाव मोटारसायकल गोदावरी नदीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तपोवन परिसरात घडली. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणारे मनोज सुदर्शन शर्मा (३६), बुद्धराम रामजीत शर्मा (३०) व हिरेंद्र शर्मा (२२) हे मूळचे बिहारचे रहिवासी शुक्रवारी काही कामानिमित्त तपोवन परिसरात गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारसायकलवरून पाथर्डी फाटय़ाकडे परतत असताना कन्नमवार पुलाखालील रस्त्यावर उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारसायकलसह तिघेही गोदावरीत कोसळले. त्यात मनोज हा  ठार झाला, तर इतर दोघे जखमी झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bike fall in godavari one killed

ताज्या बातम्या