शासकीय सुट्टीमुळे चालकाअभावी बेशुध्दा मोराला उपचारासाठी दुचाकीवरुन नेण्याची वेळ शनिवारी वन कर्मचाऱ्यांवर आली. सुट्टीमुळे या मोरावर सायंकाळपर्यंत वैद्यकीय उपचारही मिळू शकले नव्हते.
हेही वाचा >>> सातारा:आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम




कुपवाड येथे रस्त्याकडेला मुर्छा येऊन एक मोर पडला असल्याची माहिती अज्ञातांने वन विभागाला दिली. त्याला घटनास्थळाहून आणण्यासाठी वाहन चालक सुट्टीमुळे उपलब्ध नव्हता. यामुळे वन कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरुनच या मोराला कुपवाडमधील वन विभागीय कार्यालयात आणले. मात्र वैद्यकीय तज्ञाअभावी उपचारही करता आलेले नाहीत. काही तरी खाल्ल्यामुळे या मोराला विषबाधा झाली असावी, त्यामुळे त्याला मुर्च्छा आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.