scorecardresearch

Premium

स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्रे

जिल्ह्य़ातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर बायोमेट्रिक यंत्रे बसवण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली. बापट शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी नगरमध्ये आले होते,

स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्रे

जिल्ह्य़ातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर बायोमेट्रिक यंत्रे बसवण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली. बापट शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी नगरमध्ये आले होते, त्या वेळी त्यांनी संबंधित अधिका-यांच्या बैठकीत ही सूचना केली.
स्वस्त धान्य दुकानांवरील अन्नधान्य वितरण वाहतुकीचे कंत्राट राज्यस्तराऐवजी जिल्हास्तरावरच निश्चित करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेल्या मालाला गोदाम उपलब्ध करून देणे, वाहन उपलब्ध करणे याबाबतही त्यांनी अधिका-यांना सूचना केल्या.
सरकारी विश्रामगृहावर बापट यांचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी स्वागत केले. आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, विभागीय उपायुक्त (पुरवठा) रावसाहेब बागडे, सहायक आयुक्त (औषध) स. मा. साक्रीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार आदी उपस्थित होते.

jobs in india
‘मनरेगा’साठी १२६६ कंत्राटी अभियंत्यांची भरती
cleanliness campaign on sunday in mumbai
मुंबईत रविवारी लोकसहभागातून स्वच्छता
government schools in maharashtra
शिंदे सरकार ६२ हजार सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देणार, बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीनंतर आता शिक्षणाचेही खासगीकरण
rohit pawar criticized maha government
…तर सरकार कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या! रोहित पवार असे का म्हणाले? जाणून घ्या

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Biometric devices in cheap food shop

First published on: 01-02-2015 at 03:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×