scorecardresearch

“तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी”

“मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे”

BJP, Amit Satam, Maharashtra CM Uddhav Thackeray, Tipu Sultan
"मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे"

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच मी समस्त हिंदूंतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले असं आमदार अमित साटम यांनी म्हटलं आहे. महापौर किशोरी पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरत आहेत असा आरोप अमित साटम यांनी केला आहे.

“वास्तविकतेत जर टिपू सुलताना नामफलक अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचावकार्यातच त्या मग्न आहेत,” असं अमित साटम म्हणाले आहेत.

“धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालकमंत्री अवैधरित्या टिपू सुलतान क्रीडांगण बांधतायेत. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत,” असा आरोप अमित साटम यांनी केला आहे.

“आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे,” अशी मागणी साटम यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp amit satam letter to maharashtra cm uddhav thackeray over tipu sultan controversy sgy

ताज्या बातम्या