नाशिकमध्ये भाजपा नेत्याच्या हत्येमुळे तणाव; धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन खून झाल्याने खळबळ

nashik murder, bjp leader murder in nashik, Amol ighe murder in nashik,
नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन खून झाल्याने खळबळ

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन खून झाले आहेत. दरम्यान भाजपा नेत्याची हत्या झाल्यानी माहिती समोर येताच शहरात खळबळ माजली आहे. नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली असून यामुळे शहर हादरलं आहे. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

पंचवटीत भाजी विक्रेत्याची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी एमआयडीसी मध्ये गेले होते. त्यावेळी तिथे अंतर्गत वाद झाले आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये कौमार्य चाचणीचा प्रकार; जुना व्हिडीओ व्हायरल झाल्याने खुलासा

अमोल इघे यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसातील ही तिसरी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची डोक्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp amol ighe murder in nashik sgy

ताज्या बातम्या