विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटलं आहे. हे प्रकरण ताजं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. आव्हाडांच्या विधानामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेऊन ज्याठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, अशा आशयाचं विधान आव्हाडांनी केलं आहे. या विधानानंतर सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..

हेही वाचा- “शेंबडं पोरगंसुद्धा…”, सावरकर आणि गोळवलकरांबाबतच्या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही किती मूर्ख आणि चुकीचे आहात, हे राज्यातील जनता मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

आव्हाडांच्या विधानावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड आता नवीन इतिहास लिहित आहेत. पण तुम्ही म्हणाल तो इतिहास, असं चालणार नाही. जो इतिहास आहे, तोच इतिहास राहील. तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमच्याशी सहमत असणारे फार कमी आहेत. पण तुम्ही जे म्हणत आहात, त्याला चूक म्हणणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे तुम्ही मूर्ख कसे आहात… तुम्ही चुकीचे कसे आहात… तुम्ही इतिहास कसा बदलवायला बसला आहात, हे हजारो-कोट्यवधी लोक मतदानातून दाखवत असतात, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली.