Chandrakant Patil on Sadanand Sule: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला होता. तसंच दिल्लीत जा नाहीतर मसणात जा असं म्हटलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटलांना स्त्रीद्वेषी म्हटलं होतं. या सर्व घडामोडींवर चंद्रकातं पाटील यांना उत्तर दिलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सदानंद सुळेंनी काय उत्तर दिलं होतं?

“हे आहेत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं हे स्त्रीद्वेषी आहेत, जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय,” अशा शब्दांत सदानंद सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटील यांना सदानंद सुळे यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सुप्रिया सुळेच नाही तर कोणत्याही महिलेला आदर देण्याचा माझा स्वभाव आहे. माझ्या पक्षाचे विधानसभेत जितके महिला आमदार आहेत तितके कोणाचंच नाही. त्यामुळे सदानंदजी ग्रामीण भागात थोडं राहायला शिका. पोरालाही आई मसणात जा असं म्हणते. याचा अर्थ त्याला स्मशानभूमीत जा असा नसत. तसंच काही जमत नसेल तर सोड बघू हे असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंबद्दल अनादर नाही. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आदराने एकमेकांची चौकशी करतो. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे”.

पत्नीला ‘मसणात जा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले; म्हणाले “मला नेहमीच वाटत होतं हे…”

“स्त्रीद्वेषी असण्याचा काय विषय आहे. आपण स्वयंपाकाचा विषय काढून टाकू, मी फक्त घऱी जा म्हटलं होतं. त्यामुळे सदानंदजी तुमच्या पत्नीचाच नाही तर कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी संताप व्यक्त केला त्यांना मी सात्विक संताप व्यक्त केल्याचा आनंद आहे. त्यामुळे त्याचा इतका मोठा मुद्दा करण्याची गरज नाही”.

“तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा”; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

२०२४ ला मतदार तुम्हाला मसणात पाठवतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून आली असल्याचं सांगितलं असता ते म्हणाले की, “लोकशाहीत सगळ्याची तयारी ठेवायची असते. त्यांना मान्य नाही, पण कालचक्र फिरत असतं. कोण कोणाला मसणात पाठवणार हे काळ ठरवेल”.

कुठून सुरू झाला वाद?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावरून हा कलगीतुरा सुरू झाला. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे”, असं त्या म्हणाल्या.

“घरी जा आणि स्वयंपाक करा” म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी त्याचा इतका…!”

सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले. ‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसंच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटलं होतं. याबाबत माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. तसंच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.