राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सकाळी केलेल्या एका ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात बरीच रंगली होती. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. हा अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांनाच टोला असल्याचं बोललं गेलं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देखील दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी स्वत:च आपल्या ट्वीटबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रा वाघ यांनी सकाळीच ट्वीट करून राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांविषयी आपली भूमिका मांडली. “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला उत्तर दिलं.

“रावणाला मदत करणारी शुर्पणखा” या चित्रा वाघ यांच्या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…!

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आत्ता कुठे राज्यातली जनता सावरतेय. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक जबाबदार नागरीक म्हणून आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मात्र, या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना चित्रा वाघ यांनी आपण ट्वीटमध्ये रुपाली चाकणकर यांचं नावच घेतलं नव्हतं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. “अशा ठिकाणी राजकीय महिलांची नियुक्ती साधारणपणे केली जाते. तिथे येणाऱ्या महिलेने शुर्पणखासारखी रावणांना मदत करू नये. मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही. पण कुणी स्वत:च्या अंगाला लावून शुर्पणखा झालं असेल तर मला त्याबद्दल कल्पना नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

चित्रा वाघ यांचं ट्वीट

रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा

रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या, तर त्यांना विरोध करणारी मी कोण आहे? त्या बसल्या, तर त्यांना शुभेच्छाच आहेत. फक्त जी कुठली महिला येईल, तिने रावणाला साथ देऊ नये, इतकीच अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chitra wagh targets ncp rupali chakankar on shurpnakha tweet pmw
First published on: 14-10-2021 at 14:19 IST