कोल्हापूर महापालिकेत भाजपा नगरसेवकाने घेतलं काँग्रेस नगरसेवकाचं चुंबन

कोल्हापूर महापालिकेच्या सभेत झालेल्या या प्रकाराची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे

कोल्हापूर महापालिकेत भाजपा नगरसेवक कमलाकार भोपळे यांनी काँग्रेस नगरसेवक शारंगधर देशमुख यांचं चुंबन घेतलं. कोल्हापूर महापालिकेत भाजपा विरोधी पक्षात आहे आणि कमलाकर भोपळे हे भाजपाचे नगरसेवक आहेत. आपल्याला आपल्या पक्षात जेवढा मान दिला जात नाही तेवढा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिला जातो. त्यामुळे मी खुश आहे असं म्हणत त्यांनी सत्तारुढ पक्षातील शारंगधर देशमुख यांचं चुंबन घेतलं

नेमकं काय घडलं?

कोल्हापूर महापालिकेत महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या राजीनाम्यासाठीची सभा सुरु होती. त्यावेळी विरोधी बाकांवर बसलेले नगरसेवक कमलाकार भोपळे हे विरोधी बाकांवरुन उठले आणि थेट काँग्रेस नगरसेवक बसलेल्या म्हणजेच सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. मला भाजपात किंमत दिली जात नाही तेवढी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिली जाते असं म्हणत त्यांनी शारंगधर देशमुख यांचं चुंबन घेतलं. दीड तासापूर्वी हा प्रकार घडला.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp corporator kissed congress corporator in kolhapur mahapalika scj