सांगली : इस्लामपूर आगारातील सजवलेल्या विठाई बसचे सारथ्य विनापरवाना केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी भाजपने बुधवारी पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी चौकशी करून उद्या सायंकाळपर्यंत  योग्य ती कारवाई करू असे आश्‍वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यदिनादिवशी आ. पाटील यांनी इस्लामपूर आगारातील बसचे सारथ्य  करीत शहरातून सुमारे दोन किलोमीटरचा फेरफटका मारला. याची ध्वनीचित्रफित  समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराला भाजपने आक्षेप घेत आ. पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा बुधवारी  दिले.

वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, सरचिटणीस संदीप सावंत, सतेज पाटील, संजय हवलदार, प्रवीण परीट, रामभाउ शेवाळे आदींच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी निवेदन निरीक्षक चव्हाण यांना दिले.

हेही वाचा >>> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

आ. पाटील यांचे कृत्य बेकायदा आहे. उप प्रादेशिक कार्यालयाकडून कोणतीही  अनुज्ञप्ती घेतलेली नसताना, प्रवासी बस चालविण्याचा अनुभव नसताना सार्वजनिक रस्त्यावर अशा पध्दतीने वाहन चालविणे सर्वसामान्य लोकांच्या जिवीताला धोका उत्पन्न करणारे असून हा केवळ प्रसिध्दीसाठी  केलेला  खटाटोप असला तरी यामुळे सार्वजनिक स्वास्थ्य अडचणीत येउ शकते. एसटी  कर्मचार्‍यांचे साडेपाच महिने आंदोलन सुरू असताना  आ. पाटील या आंदोलनाकडे फिरकलेही नाहीत, आता मात्र, कर्मचार्‍यांचा त्यांना पुळका कसा आला असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना शांत केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp demands to file case against jayant patil for driving st bus without licence zws
First published on: 17-08-2022 at 16:43 IST