वैफल्यग्रस्त असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले…

“राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”

Devendra Fadanvis Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असून तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मी वैफल्यग्रस्त नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसदेखील कोकण दौऱ्यावर असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले –
मोदींकडून गुजरातची पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोला फडणवीसांना लगावला.

“मी वैफल्यग्रस्त नाही,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाली किती देते या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देताना ते म्हणाले की, “त्याची काळजी तुम्ही करु नका. कोकण आणि शिवसेनेचं नात घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही”.

फडणवीसांचं उत्तर –
“त्याच्यावर मला काही राजकीय बोलायचं नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचं समाधान आहे. आम्ही त्याचं राजकारण करत नाही. पण मग जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? मग येथे मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही येता आणि जाता….मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिलं नाही. गेल्यावेळचे निसर्ग वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp devendra fadanvis on maharashtra cm uddhav thackeray konkan tour cyclone tauktae sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या