धक्कादायक! भाजपाच्या माजी आमदाराचा सर्वांसमोर गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घडल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे

BJP, Balasaheb Murkute, बाळासाहेब मुरकुटेंचा आत्महत्येचा प्रयत्न, कृषीपंप वीज तोडणी
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घडल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे

भाजपाच्या माजी आमदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज वितरणच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. अहमदनगरमधील कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून नेवासा येथील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आंदोलन करताना त्यांना टोकाचं पाऊल उचललं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं –

नेवासा येथील वीज तोडणीविरोधात भाजपातर्फे वितरण कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात येत होते. यावेळी भाजपाकडून पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत होती. बाळासाहेब मुरकुटेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन करुनही मागणी मान्य होत नसल्यामुळे मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तिथे उपस्थित इतर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी मुरकुटेंना रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घडल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp former mla balasaheb murkute tried to commit suicide in ahmednagar sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या