पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“चौंडीचे प्रशासन प्रस्थपितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाला परवानगी दिली जात नाही. बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही हे ध्यानात घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे,” असा इशारा गोपीचांद पडळकर यांनी दिला आहे.

बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्रही शेअऱ केलं आहे.

कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “हिंदू संस्कृतीच्या जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी चौंडी येथे दिमाखात साजरी केली जाते. चौंडी येथील जयंतीचा कार्यक्रम सर्वपक्षीय सर्व जातीधर्माच्या लोकांचा असतो. लाखो लोक येथे आपल्या मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. ह्या वर्षीदेखील ३१ मे रोजी जनसमुदाय येणार असून त्या जनसमुदायास मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gopichand padalkar maharashtra government ahilyabai devi birth anniversary sgy
First published on: 27-05-2022 at 09:19 IST