भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. या विजयानंतर मुंबईतही भाजपा नेत्यांकडून विजयाचं सेलिब्रेशन केलं जात आहे. भाजपा कार्यालयाबाहेर गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना शरद पवारांवर टीका केली.

‘युपी झांकी है, अभी महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “तो महाराष्ट्र…”

Navneet Rana advises BJP state president Chandrasekhar Bawankule Do not make fight between husband and wife
“नवरा-बायकोमध्‍ये भांडण लावू नका,” नवनीत राणांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारांना फडणवीसांचं यश अद्याप मान्य झालं नाही असं विचारण्यात असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”.

भाजपला प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा शक्य; शरद पवार यांचे मत

“फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

शरद पवार निकालावर काय म्हणाले ?

देशात भाजपाला प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते, असं मत शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर व्यक्त केलं होतं. तसंच पंजाबमधील निकाल काँग्रेसला धक्का देणारा आहे, असंही त्यांनी म्हटलं.

‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. दिल्लीत या पक्षाने ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केलं आहे. दिल्लीच्या कामाचा फायदा पंजाबमध्ये ‘आप’ला झाला. त्यामुळे पंजाब सोडलं तर लोकांनी सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते आहे.

आज देशात प्रभावी राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्चपासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. त्यानंतर पुढची नीती ठरवण्यासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.