भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आपल्या आक्रमक भूमिकांमुळे चर्चेत असतात. विशेषत: त्यांनी बारामती मतदारसंघ आणि पवार कुटुंबीय यांच्यावर सातत्याने आरोप केल्यामुळे त्या त्या वेळी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर बारामतीमधून निवडणूक लढवायलाही उभे राहिले होते. मात्र, तेव्हा मोठ्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. त्यानंतरही त्यांनी पवार कुटुंबीयांना असलेला विरोध जाहीरपणे बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर आता पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतीमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी?

गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटलांना २०२४ साली बारामतीमधून तिकीट मिळण्याचा सूचक इशारा दिला आहे. “बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बोलावंच लागेल. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. ते आज आपलं नेतृत्व आहेत. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून पक्ष कुणाला तिकीट देणार हे मला माहिती नाही. पण ज्याला कुणाला तिकीट मिळेल, तो भाग्यवान असेल. कारण पवारांना पाडून संसदेत जाण्याची संधी त्याला मिळणार आहे”, असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

“माझं ग्रहमान चांगलं नव्हतं”

दरम्यान, यावेळी बोलताना पडळकरांनी त्यांच्या झालेल्या मोठ्या पराभवावरही मिश्किल टिप्पणी केली. “बारामतीमधून भाजपाचं तिकीट मिळणारा कोण आहे, मला माहिती नाही. कुणाचं ग्रहमान चांगलं आहे ते मला माहिती नाही.माझं ग्रहमान चांगलं नव्हतं, माझं डिपॉझिट घालवलं”, असा टोला पडळकरांनी लगावला आहे.

“राहुल गांधी सावरकरांबद्दल करत असलेल्या वक्तव्यांमुळे..”, ठाकरे गटाचा इशारा; म्हणे, “आधी स्वत:च्याच पक्षात…!”

“भाजपानं मला टार्गेट दिलंय”

सातत्याने पवार कुटुंबीयांवर गोपीचंद पडळकर टीका करत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आपल्याला पक्षाकडून तसं टार्गेटच दिल्याचा उल्लेख पडळकरांनी आपल्या भाषणात केला आहे. “मी असा आहे की भाजपानं मला टार्गेट दिलं आणि तिथं नेऊन बसवलं. परत मी शरद पवारांच्या मानगुटीवर जाऊन बसलो”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gopichand padalkar targets sharad pawar family in baramati loksabha constituency pmw
First published on: 27-03-2023 at 10:31 IST