BJP Politics in Maharashtra Election: राज्यात सध्या नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल याची चर्चा चालू आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये बैठका होत असताना दुसरीकडे निकालाचं विश्लेषण केलं जात आहे. भाजपा व महायुतीसाठी यंदा हिंदुत्वाचा मुद्दा कळीचा ठरल्याचं बोललं जात आहे. प्रचारकाळात सभांमधून दिल्या जाणाऱ्या घोषणांचा कल याच मुद्द्याच्या भोवती फिरत असल्याचंही विश्लेषण केलं जात आहे. पण हिंदुत्वाचा मुद्दा हा मूळचा भाजपाचा नसून बाळासाहेब ठाकरेंचा असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचं विश्लेषण करण्यासाठी लोकसत्ताच्या कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांच्यासह ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव साबडे आणि प्रकाश अकोलकर सहभागी झाले होते. यावेळी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. तसेच, मुख्यमंत्रीपदासाठीच्या बैठका आणि त्यामागच्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांवरही त्यांनी भूमिका मांडली.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

पालिका निवडणुका आघाडीत की स्वतंत्र?

लोकसभा व विधानसभा निवडणुका दोन्ही बाजूच्या आघाड्यांनी महायुती किंवा मविआ म्हणून लढवल्या. मात्र, आता या आघाड्यांमधील पक्ष मुंबईसह इतर महानगर पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याअनुषंगाने पालिका निवडणुकांबाबत संजीव साबडे यांनी विश्लेषण केलं. “अधिकाधिक कार्यकर्त्यांना पालिका निवडणुका लढवण्याची इच्छा असते. जर त्यात तीन पक्ष आले, तर जागा आणखी कमी होणार. बंडखोरी वाढणार. त्याऐवजी आपल्याकडे काय ताकद आहे ती बघूयात असा विचार मविआतील पक्ष करू शकतात”, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी शिवसेना व भाजपा यांच्यात सुरुवातीपासून जागावाटप व सत्तावाटप कसं व्हायचं, याबाबत गिरीश कुबेर यांनी सविस्तर पार्श्वभूमी सांगितली. “युतीच्या काळात प्रमोद महाजन सगळ घडवत होते. तेव्हा त्यांचं ठरलेला सिद्धांत असायचा. १७१ आणि ११७. म्हणजे शिवसेना व भाजपा किती जागा लढवणार याचं ते सूत्र होते. शिवसेनेला ते जास्त जागा द्यायचे. आता तर त्या सूत्राचा विषय संपलेलाच आहे. तेव्हा महाजन म्हणायचे की काही वर्षांनंतर ११७ जागांचं हे जोखड काढून टाकायला हवं कारण बाकीच्या १७१ मतदारसंघांमध्ये भाजपा वाढत नाहीये. युतीत भागीदारी होते तेव्हा तोटा हाही असतो की आपला पक्ष त्या भागात वाढत नाही. कारण आपण सहयोगी भूमिका घेतलेली असते”, असं ते म्हणाले.

हिंदुत्वाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात कसा आला?

प्रकाश अकोलकर यांनी यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात कसा आला, याबाबत सविस्तर भाष्य केलं. “शिवसेनेला महापालिकेत पहिल्यांदा सत्ता १९८५ साली मिळाली. १९८७ साली रमेश प्रभू विले पार्लेमधून जिंकून आले. १९८७ साली शरद पवारांच्या पुलोदमध्ये भाजपा असल्यामुळे भाजपाला जनता पक्षाच्या उमेदवाराला समर्थन द्यावं लागलं होतं. तेव्हा भाजपा व शिवसेनेची युती नव्हती. तेव्हा सेनेने तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा घराघरांत पोहोचवली. त्यांनी ती इतक्या त्वेषाने पोहोचवली की लोकांना ती बाळासाहेबांचीच आहे असं वाटलं. पण बाळासाहेबांनीच मला एकदा सांगितलं होतं की आचार्य धर्मेंद्र म्हणून विश्व हिंदू परिषदेचे गृहस्थ होते, त्यांनी ती दिली होती. मी फक्त ती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर घराघरांवर स्टिकर्स लागले”, असं ते म्हणाले.

Video: एकनाथ शिंदेंवर ठाकरे सरकारप्रमाणेच वेळ ओढवणार? आता अजित पवारांकडे पुन्हा अर्थखातं गेल्यास काय करणार?

“त्यावरून त्यांची निवडणूक रद्द झाली. बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क गेला. प्रभू निवडून आल्यानंतर प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं की आपण जर शरद पवारांबरोबर पुलोदमध्ये राहिलो आणि जनता पक्षाला पाठिंबा देण्यासारखे उद्योग केले तर महाराष्ट्रातली हिंदुत्वाची व्होटबँक बाळासाहेब ठाकरे घेऊन जातील”, अशा शब्दांत अकोलकरांनी त्या वेळच्या घडामोडींची माहिती दिली.

भाजपानं हळूहळू शिवसेनाच घेऊन टाकली – कुबेर

अकोलकरांच्या या मताला गिरीश कुबेर यांनी दुजोरा दिला. “त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा भाजपाने शिवसेनेकडून घेतला. हळूहळू काळाच्या ओघात त्यांनी शिवसेनाच घेऊन टाकली”, असं ते म्हणाले. यावर “भाजपा तेच करतंय. त्यांनी उद्धव ठाकरेंना गिळंकृत करून, हतबल करून त्यांचे कमीक कमी आमदार येतील हे साध्य केलंच आहे. पण हाच खेळ त्यांनी एकनाथ शिंदेंवर खेळून त्यांचं खच्चीकरण कसं होईल आणि ते हतबल होऊन आपल्या अंकित कसे राहतील ही राजनीती अवलंबून सुरू केला आहे”, अशी पुस्ती अकोलकर यांनी जोडली.