scorecardresearch

राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा हस्तक्षेप; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा आरोप

विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, गेल्या सातआठ वर्षांत स्पर्धेच्या संयोजनात भाजपने त्यांच्या मर्जीतील नेमणूक परीक्षकपदी करून त्यांच्या विचारधारेच्या नाटकांना पारितोषिके देण्याबाबत प्रयत्न केले.

राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा हस्तक्षेप; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा आरोप
राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा हस्तक्षेप

पुणे : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत समन्वयक, उपसमन्वयक नियुक्तीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने केला आहे.

हेही वाचा >>> टोमॅटोला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव; कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, गेल्या सातआठ वर्षांत स्पर्धेच्या संयोजनात भाजपने त्यांच्या मर्जीतील नेमणूक परीक्षकपदी करून त्यांच्या विचारधारेच्या नाटकांना पारितोषिके देण्याबाबत प्रयत्न केले. पुरोगामी विचारांची मांडणी असलेल्या नाटकांचे खच्चीकरण करण्याचे काम केले. यंदा तर राज्यभरातील केंद्रांवर नियुक्त केलेले स्पर्धा समन्वयक बदलण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. या मनमानी कारभाराविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 09:24 IST

संबंधित बातम्या