“खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या अभ्यासावर कारवाई होणार का?”; नवाब मलिकांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना सवाल

अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

BJP, Keshav Upadhye, Maharashtra CM Uddhav Thackeray, NCP, Nawab Malik, केशव उपाध्ये, नवाब मलिक, भाजपा, उद्धव ठाकरे
अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

एमएमआरडीएकडून गुरुवारी मु्ंबईत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतक्या मोठ्या प्रकल्पांबाबत तुम्ही अभ्यास केला आहे ना? अशी विचारणा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. तसंच अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो अशी कोपरखळीही मारली. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला असून नवाब मलिक यांच्यावर कारवाई करणार का? अशी विचारणा केली आहे.

“अभ्यास करणे हे आमचे काम नाही, आम्ही फक्त मार्क्स देतो असे मुख्यमंत्री स्वत:च कबूल करत असताना नवाब मलिक मात्र जन्म-विवाह दाखल्याच्या अभ्यासासाठी मंत्रीपद पणाला लावतात. अभ्यास करायचा नाही हे मुख्यमंत्री सांगत असतानाही खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?,” असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते –

एमएमआरडीएने मुंबईत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील वाहतूक आराखडा यावर चर्चा करत तो अंतिम केला जाणार आहे. मुंबई महानगरमध्ये सुरु असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या वाहतुकीच्या प्रकल्पांबाबत तसंच भविष्यातील प्रकल्पांबाबत एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं.

यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पांबाबत तुम्ही अभ्यास केला आहे ना ? अशी विचारणा मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. “अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे”, असं मुख्यमत्री उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. कर्तव्य पार पाडताना राजकारण करु नये, राजकारण येऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp keshav upadhye tweet on maharashtra cm uddhav thackeray ncp nawab malik sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या