गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच, अनिल परब, सईद खान अटक, आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल या मुद्द्यांवर देखील त्यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आंबेमातेकडे मी प्रार्थना केली आहे की मातेनं त्यावेळी राक्षसाचा वध केला होता. आत्ता महाराष्ट्राला भ्रष्टाचाररुपी एक शाप मिळालाय, भ्रष्टाचाराचा राक्षस तयार झाला आहे, त्याचा वध करण्यासाठी मला शक्ती दे”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

“एकीकडे महाराष्ट्राचे साडेबारा कोटी लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात क्रांतीच्या स्वरूपात रस्त्यावर असतात. आम्हाला प्रार्थना करतात. आणि हे राक्षसरुपी सरकार आम्हाला जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती आता सुरू झाली आहे. आंबेमाता, आम्हाला आशीर्वाद दे”, असं देखील किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्याबद्दल विचारणा केली असता त्यावर त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “अनिल परबांची गोड बातमी म्हटलं तर योग्य दिसणार नाही. पण भावना गवळीचा पार्टनर सईद खान, ज्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्या सईदखानला आज अटक केली आणि तो जेलमध्ये गेला”, असं सोमय्या म्हणाले.

“माझं काम आहे जनतेला लुटणारे घोटाळे उघड करणं”

दरम्यान, घोटाळे उघड करणं आपलं काम असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. “हे ईडीच्या समोर जाण्याऐवजी गायब होतात. आमचे हसन मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आनंद अडसूळांना अटक करण्यासाठी गेले असता तेही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. काही लोक गायब होतात. माझं काम आहे की ज्यांनी राज्याच्या जनतेला लुटलं आहे, तो घोटाळा उघड करणं आणि पाठपुरावा करणं”, असं सोमय्यांनी सांगितलं.

अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, “ईडीनं मला का बोलावलं आहे हे…”

अनिल परब ईडीच्या कार्यालयात हजर

दरम्यान, आज सकाळीच अनिल परब ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. “ईडीचं दुसऱ्यांदा समन्स आल्यानंतर मी आज चौकशीसाठी चाललो आहे. ईडीनं नेमकं कोणत्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी मला बोलावलं आहे, ते माहिती नाही. पण चौकशीत सहकार्य करण्याचीच माझी भूमिका राहील”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya targets cm uddhav thackeray government in maharashtra at kolhapur pmw
First published on: 28-09-2021 at 12:54 IST