मध्यावधी निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…

राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी खोचक टोला लगावला आहे.

sharad pawar chandrakant patil
भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

भाजपा आणि शिंदे गटाने एकत्रित येत राज्यात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांचं स्वागत केले. यांनतर चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे सरकार भाजपाचं की बंडखोरांच? देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? अशा प्रश्नांवर बोलताना पाटील म्हणाले की, बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच आहे. भाजपामध्ये कुठलीही नाराजी नाही. हिंदुत्वाच रक्षण करणारं आणि विकास कामांना चालना देणारं हे सरकार आहे. त्यामुळे भाजपामधील प्रत्येक नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रचंड खूश आहे. हे सरकार पडावं असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्याने प्रत्येकाला आनंद झाला असल्याचं त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जे सरकार होतं ते हिंदुत्वाविरोधी, विकास विरोधी, विकास काम ठप्प करणारं, गुन्हेगारांना पाठीशी घालणारं, कोणतीही चूक नसणार्‍यांना तुरुंगात टाकणारं असं एक महाभयानक सरकार बर्‍याच वर्षांनी कृत्रिम युती करून आलं होतं. ते सरकार देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या अथक प्रयत्नामुळे कोसळलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच हिंदुत्वाचं रक्षण करणार,” असंही त्यांनी सांगितले.

राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी असं म्हणावं लागतं. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब जे म्हणतात, त्याच्या उलटं त्यांना म्हणायचं असतं, असंही पाटील म्हणाले.

कोल्हापुरातील पूरपरिस्थितीबाबत त्यांनी सांगितलं की, “मी एक महिन्यापूर्वी या प्रश्नावर आवाज उठवला होता. प्रशासनासोबत बैठक देखील घेतली होती. परमेश्वराच्या कृपेने तिथे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. अन्यथा हजारो संसार उद्धवस्त होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आढावा घेतला असून कोल्हापूर येथे एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader chandrakant patil on ncp chief sharad pawar about mid election kothrud svk 88 rmm

Next Story
‘नेमकं मुख्यमंत्री कोण?’ शिंदे – फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओवर काँग्रेस नेत्याचे खोचक ट्वीट
फोटो गॅलरी