लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यातील मतदारसंघांमधला प्रचार थांबला आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर इतर टप्प्यांसाठी मतदान आणि प्रचार मात्र चालू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश शरद पवार गटाडून करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला शरद पवार गटाने शपथनामा असं नाव दिलं आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
uddhav thackeray eknath shinde
“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”

हेही वाचा >> Video: शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित; जातनिहाय जनगणना, महिला आरक्षणासह ‘या’ प्रमुख मुद्द्यांचा केला समावेश!

“खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे!!” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा >> पंतप्रधान असे कसे बोलू शकतात? शरद पवार यांचा सवाल

“१९७७ मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

काय आहे शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात?

आज सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला. “शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं म्हणणं मांडलं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील. गरज पडली, तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल, जसं पूर्वी यूपीएच्या काळात व्हायचं. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचं काम होईल”, असं म्हणत जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील दोन प्रमुख तरतुदींचा उल्लेख केला आहे.