scorecardresearch

Premium

“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल, माहीत नाही”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भविष्यात…”

अजित पवारांनी अर्थखात्याबाबत केलेल्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar-Bawankule-Ajit-Pawar
चंद्रशेखर बावनकुळे व अजित पवार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (२३ सप्टेंबर) बारामतीत अर्थ खात्याबाबत मोठं विधान केलं. “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही,” असं विधान अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. महायुतीत अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या कथित नाराजीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांचं विधान नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. तसेच भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं, असं सूचक विधानही बावनकुळेंनी केलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
devendra fadnavis reaction on chandrashekhar bawankule
“भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
ajit pawar jayant patil
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…

हेही वाचा- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…

अर्थ खात्याबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं. उद्या काय होईल? किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल? हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे अजित पवारांचं विधान हे नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही.”

हेही वाचा – “अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांच्या विधानावर खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना डावललं जात…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सहकारी संस्थांना अर्थबळ पुरवण्याबाबत अजित पवार बारामतीत म्हणाले, “टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule on ajit pawar statement about finance minister post rmm

First published on: 24-09-2023 at 13:56 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×