Chitra Wagh vs Vidya Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. विद्या चव्हाण आणि त्यांच्या सून यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कलह सुरू आहे. या कलहात चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकवून आमच्याविरोधात बोलण्याची चिथावणी दिली, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तसेच चित्रा वाघ या सुनेला मार्गदर्शन करत असल्याची तथाकथित ऑडिओ क्लीपही ऐकवली. यानंतर चित्रा वाघ यांनीही लागलीच पत्रकार परिषद घेत हे आरोप तर मान्य केलेच, पण त्यामागची पार्श्वभूमी सांगितली. तसेच राष्ट्रवादीत असताना माझ्याबरोबर जे झाले, ते उघड करेन, असे प्रतिआव्हानही दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…तर पवार साहेबांना त्रास होईल

चित्रा वाघ म्हणाल्या, “मी राष्ट्रवादीत २० वर्ष काम करत असताना ११० टक्के योगदान दिले. काम करताना मला कधीही लाभाचे पद मिळेल, अशी अपेक्षा केली नाही. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम केले. पण माझ्याबरोबर पक्षाने काय काय केले, याची मूठ झाकलेली आहे. ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल.

हे वाचा >> “पुरुषाला धर्म नसतो…”, शर्मिला ठाकरेंचा संताप; दाऊद शेख आणि मंदिराचे पुजारी यांना शिक्षा देण्याची मागणी

विद्या चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर देताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, माझ्या डॉक्टरांकडे मी गेलेली असताना त्यांच्या ओळखीतून विद्या चव्हाण यांची डॉक्टर सून गौरी चव्हाण या तिच्या वडिलांसह मला भेटायला आल्या होत्या. तिथे त्यांनी मला त्यांचा जो छळ होत होता, त्याची माहिती दिली. मुलाच्या हव्यासापोटी सूनेचा छळ केला जात होता. गौरी चव्हाण यांना पहिली मुलगी आहे. तसेच विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलानेही सुनेचा छळ केल्याची तक्रार गौरी चव्हाण यांनी माझ्याकडे केल्याचे, चित्रा वाघ म्हणाल्या.

हे ही वाचा >> एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? संशयित आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी दिली माहिती!

वाद कसा सुरू झाला?

चित्रा वाघ यांनी २८ जुलै रोजी एक कार्टून एक्सवर पोस्ट केले होते. या पोस्टनंतर शरद पवार गटकडून नापंसती व्यक्त करण्यात आली. तसेच काही नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही आरोप करण्यास सुरुवात केली.

शरद पवार यांना शरद अली असे म्हणणारे कार्टून शेअर केल्यानंतर विद्या चव्हाण यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून आज (दि. ३० जुलै) चित्रा वाघ यांच्या काळ्या कारनाम्याची पेन ड्राईव्ह जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑडिओ क्लीप ऐकवून आरोप केले.

होय, मी सुनेला मदत केली

दरम्यान चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांच्या सुनेला मदत केल्याचे मान्य केले. तसेच विद्या चव्हाण यांचा न्यायालयीन लढाईत पराभव झाला असून आता त्यांची नात सुनेकडे आहे, अशीही माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh big allegation on ncp party and ex mlc vidya chavan kvg
Show comments