Sujay Vikhe-Patil : “…तर तुमची गाठ माझ्याशी आहे”, माजी खासदार सुजय विखेंचा इशारा कोणाला?

माजी खासदार सुजय विखे यांचा राहता मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली.

Sujay Vikhe-Patil
माजी खासदार सुजय विखे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Sujay Vikhe-Patil : विधानसभेची निवडणूक तोडांवर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच सभा, मेळावे आणि बैठका घेत एक प्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापलं असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी खासदार सुजय विखे राहता विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

आता माजी खासदार सुजय विखे यांचा राहता मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. “शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जर कोणीही धर्माच्या आणि जातीच्या नावावर द्वेष पसरवण्याचं काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. मात्र, सुजय विखे यांनी कोणाचंही नाव न घेता हा इशारा दिला असल्यामुळे त्यांनी नेमकं कोणाला इशारा दिला? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

Asha Bhosale on ladki bahin scheme
Asha Bhosle: ‘.. तर मला दोन वेळचं जेवण मिळालं असतं’, मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना आशा भोसले भावुक
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Yuva Sena office bearer, Shinde group,
शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यासह अनेक नगरसेवकांचा रविवारी ठाकरे गटात प्रवेश?
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
sharad pawar, pm narendra modi
“पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!
Bhosari Vidhan Sabha, Vilas Lande, Sharad Pawar group,
भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती
sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
Congress President Mallikarjun Kharge became unwell
Mallikarjun Kharge : भाषण करताना बिघडली मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती, पक्षाचे कार्यकर्ते हात धरुन घेऊन गेले

हेही वाचा : Jay Pawar : बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचं सूचक विधान; म्हणाले,”अजित पवार…”

सुजय विखे काय म्हणाले?

“असे किती लोक आहेत त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कमीत कमी सहा महिने दिसत नाहीत. कोणी दु:खात असतं. कोणी सांयकाळी बसलं की दोन दिवस हटत नाही. शेवटी दु:खामधून बाहेर येण्याचा ज्याचा त्याचा मार्ग असतो. माझा निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर लगेच दुसऱ्यादिवशी मी इदगाह मैदानावर होतो. शेवटी एवढंच सांगतो की, या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जर कोणीही धर्माच्या आणि जातीच्या नावावर द्वेष पसरवण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे मी आता स्पष्ट सांगतो”, असा इशारा सुजय विखे यांनी दिला.

“इथं कोणीही असुरक्षित नाही. या ठिकाणी कोणालाही संरक्षण देण्याची गरज नाही. हिंदूंना आणि मुस्लिमांनाही संरक्षणाची गरज नाही. वर्षानुवर्ष आपण एकमेकांबरोबर राहिलो आहोत. मग संरक्षण का पाहिजे? कोणत्या जातीचं काम माणसांची जात विचारून केलं जातं? मात्र, ज्यांना जातीवाद आणि धर्मवाद करायचा असेल त्यांनी मला सांगा. मग आम्हीही सांगू की अर्ज करताना त्या ठिकाणी धर्म लिहा, जात लिहा. तुमच्या मतदारसंघात तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम केलं. पण कधीही जात विचारलेली नाही. पण काहीजण जातीचा द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत”, असा आरोप सुजय विखे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader former mp sujay vikhe patil on shirdi assembly constituency election 2024 politics gkt

First published on: 02-09-2024 at 16:00 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या