सध्या लोकसभा निवडणूक झाली तर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील आणि भाजपा प्रणित एनडीएच्या जागा कमी होतील, असा अंदाज सी-वोटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याच सर्व्हेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला सध्याच्या जागाही राखता येणार नाहीत, असा दावा भाजपा प्रणित एनडीएकडून केला जात आहे. तर सर्व्हेमध्ये सांगितलेल्या जागांपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सी वोटरचा सर्व्हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरच आता भाजपाचे खासदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >> MIMची महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर; इम्तियाज जलील म्हणाले, “ओवैसी साहेबांसोबत…”

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

पक्षाची लायकी, पात्रता किती आहे त्यानुसारच बोलावे

“शरद पवार यांचे सध्या तीन खासदार आहेत. ते कायम राहिले म्हणजे खूप झाले. नाहीतर परत शून्यावर यायचे. त्यांनी भाजपाची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:च्या पक्षाची लायकी, पात्रता किती आहे त्यानुसारच बोलावे. आमचे गणित ४०० चे आहे. ते अजूनही ४ पर्यंत गेलेले नाहीत. आमच्यात आणि त्यांच्यात दोन शून्यांचा फरक आहे. त्यामुळे त्यांनी तत्वज्ञान सांगण्यापेक्षा पार्टी कुठे विसर्जित करायची, यावर विचारमंथन करण्याची गरज आहे,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

हेही वाचा >> पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय? प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले…

राष्ट्रवादी कोठे फुटतेय, याचा विचार करावा

“आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे विकासपुरूष आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सर्व प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांनी भाजपाची चिंता करू नये. उलट राष्ट्रवादी कोठे फुटतेय, याचा विचार करावा. भाजपाचे कार्यकर्ते भाजपाची चिंता करत आहेत,” असेही पडळकर म्हणाले.

हेही वाचा >> लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेवर संजय शिरसाट यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “पावसातील शरद पवारांच्या एका सभेने…”

महाराष्ट्राला विकासापासून कसे दूर केले, याचा विचार करायला हवा

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. “अशा पवारांना पराभूत करूनच मी राजकारणात आलोय. त्यामुळे रोहित पवार यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत बसले पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की मागील ५० वर्षांत त्यांनी कोणाकोणाची वाट लावली. आम्ही महाराष्ट्राला विकासापासून कसे दूर केले, याचा त्यांनी विचार करायला हवा,” असेही पडळकर म्हणाले.

सी वोटरच्या सर्व्हेवर शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सी-वोटर सर्वेच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “ही जी एजन्सी आहे, त्यांची अचूकता ही यापूर्वी बरीच सिद्ध झाली. पण मी एकदम त्यामध्ये जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतं आहे.”